गुरुवार, १० सप्टेंबर, २००९

मंगळवार, ९ जून, २००९

सोमवार, २५ मे, २००९

ग्राहकांचे अधिकार


ग्राहकांचे अधिकार

  • जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण.
  • बाजार पेठेतील मालाची गुणवत्ता, वजन, क्षमता, शुध्दता, दर्जानुसार किंमत जाणून घेणे
  • दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे.
  • ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे.
  • व्यापार्‍यांकडून होणार्‍या ग्राहकांची पिळवणूकीसंदर्भात दाद मागणे.
  • ग्राहक मंचच्या कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणे.

    तक्रार केव्हा कराल?
  • खरेदी केलेला माल खराब असल्यास ...
  • खरेदी केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा व्यापार्‍याने अधिक किंमत घेतली असल्यास ...
  • जीवितास किंवा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल (वस्तू) दुकानात ठेवला असेल अथवा विक्री केला असल्यास...
  • विकलेल्या वस्तुचे वजन आणि प्रत्यक्षात छापील असलेले वजन यात फरक आढळल्यास ...
  • जुना अथवा खराब माल नवीन वेष्टनात आकर्षक पध्दतीने ठेवून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल असल्याचे सांगून फसवणूक केल्यास ...
  • मालाची विक्री करताना योग्य चाचणी न घेतलेला माल अन्य मालाच्या तुलनेत स्वस्त दरात देऊन ग्राहकांची दिशाभूल करीत असल्यास ...
  • मालाच्या वस्तुस्थिती संदर्भात वेष्टनावरील माहिती खाडाखोड केल्यास, चिकटपट्टी लावल्यास व त्या ठिकाणी चुकीची माहिती छापल्यास उदा.मुदत बाह्य तारखेत खाडाखोड करणे, वजनाच्या ठिकाणी जादा वजन दर्शवणे, किंमतीत खाडाखोड करणे.
  • स्वत:चा माल खपविण्यासाठी ग्राहकाला खोटी आश्वासने देऊन सातत्याने प्रचार व प्रसार केल्यास.
  • मालाचा साठा करुन तो विक्री न केल्यास अथवा भाववाढ होण्याची वाट पाहून नंतर विक्री केल्यास ...
  • आपला खराब माल जास्तीत जास्त खपावा म्हणून वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे अथवा अन्य जाहिरात माध्यमातून प्रसिध्दी करुन ग्राहकांना विकल्यास व तसे पुरावे असल्यास...
  • ग्राहकांसाठी भेटवस्तू, बक्षिसे किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेत सहभागी करुन घेऊन नंतर योजनात फेरफार केल्यास, निकाल लावण्यास टाळाटाळ केल्यास ...

    कोणाविरुध्द तक्रार करावी ?
  • किराणा माल विक्रेता ...
  • औषध विक्रेता ...
  • शीतपेय विक्रेता ...
  • ट्रव्हल एजंट ...
  • सर्व प्रकारचे व्यापारी ...
  • शेतीची बियाणे, औषधे तसेच अवजारे विक्रेता ...
  • हॉस्पिटलमधील डॉक्टर्स ...
  • पोस्ट खाते किंवा कुरिअर तसेच बँक सेवा ...
  • दूरध्वनी, पाणी, गॉस संदर्भातील कार्यालय ...
  • वीज कनेक्शन आणि रस्ते संबंधित कार्यालय ...
  • विमा, शेअर किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री ...
  • एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहन विक्रेते ...
  • शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ...
  • फ्लॉट अथवा प्लॉट विक्रेता ...
  • जाहिराती सादर करणार्‍या संस्था, मॉडेल्स ...
  • पोस्टर्सवरील मजकूर आणि जाहिरात प्रसिध्द करणार्‍या संस्था ...
  • वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे ...

    तक्रार कशी कराल?
  • मालासंदर्भात काही दोष आढळून आल्यास जिल्हा ग्राहकमंच्याकडे साध्या कागदावर अथवा टंकलिखित तक्रार सहा प्रतीत सादर करावी. एकापेक्षा अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतील तर जिल्हा ग्राहक मंचाच्या परवानगीने एक किंवा अधिक ग्राहक तक्रार करु शकतात.
  • तक्रार दाखल करताना मुद्देसुद माहिती द्यावी तसेच दोषपूर्ण मालाचे नमुने सोबत सादर करणे आवश्यक आहे. पुरावे सादर करतांना माल खरेदी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. त्या पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूचे नाव, विवरण, उत्पादक कंपनीचे नाव, हमी कालावधी आदी नेंदी घ्याव्यात.
  • तक्रारदाराने प्रादेशिक भाषेतील अर्जाबरोबरच इंग्रजी भाषेत अर्ज व तपशील दिला तर ग्राहक मंच तसेच आयोगाला कार्यवाही करणे सुलभ होते.
  • तक्रार दाखल करतांना फक्त पीडित ग्राहकालाच नव्हे तर त्याच्या वतीने दुसर्‍यांनाही तक्रार करता येते.

    तक्रारीची कार्यवाही
    अ.क्र- तक्रारीचे स्वरुप कार्यवाही
    १.-तक्रार दाखल केल्यानंतर-६ महिन्यात कार्यवाही
    २.-मालाची प्रयोगशाळेत तपासणी-४५ दिवसांचा कालावधी
    ३.-२० लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-जिल्हा ग्राहक मंचाकडे सुनावणी
    ४.-१ कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-राज्य आयोगाकडे सुनावणी
    ५.-१ कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई-राष्ट्रीय आयोगाकडे सुनावणी

    तक्रार दाखल करतांना घ्यावयाची काळजी
  • तक्रारदाराचे नाव व पत्ता :
  • विरुध्द पक्षाचे नाव व पत्ता :
  • तक्रारीचा विषय :
  • तक्रारीबाबतचे पुरावे, दस्तऐवज :
  • तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई :
  • ठिकाण, दिनांक व सही :

    तक्रार दाखल करतांना येणारा खर्च
    अ.क्र-नुकसानीची रक्कम-भरावयाची रक्कम
    १.-१ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास १०० रुपये
    २.-१ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास २०० रुपये
    ३.-५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास ४०० रुपये

    राज्य आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
  • जिल्हा न्यायालयाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती राज्य आयोगाकडे ३० दिवसांच्या आत अपील करु शकते.
  • जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाने ग्राहकाला कोणतीही रक्कम भरावयाची असेल तर, अपील करणार्‍या अशा व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा २५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राज्य आयोग अशा अपिलाची दखल घेणार नाही.
  • राज्य आयोगाकडे तक्रार करतांना संपूर्ण तक्रारीचे स्वरुप सुस्पष्ट लिहावे. पुरावे सादर करावेत.
  • अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून राज्य आयोग ९० दिवसाच्या आत अपिलाची सुनावणी करतो.
  • अपीलकर्त्यांने अपील अर्जासोबत राज्य आयोगाच्या कार्यालयीन प्रयोजनासाठी तक्रार अर्जाच्या सहा प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • अपिलाच्या सुनावणी काळात अपीलकर्त्याला स्वत: आयोगासमोर उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. जर अपीलकर्ता अनुपस्थित राहिला तर आयोग एकतर्फी निकाल देतो.
  • अपीलाच्या संदर्भात राष्ट्रीय आयोगाचे आदेश पक्षकारांना मोफत देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

    राष्ट्रीय आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
  • राज्य आयोगाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे अपील करु शकते.
  • राज्य आयोगाच्या आदेशान्वये कोणती रक्कम भरणे असेल तर अपील करण्यार्‍या ग्राहकाने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ३५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल, अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राष्ट्रीय आयोग अशा व्यक्तिंच्या अपीलाची दखल घेणार नाही.
  • राष्ट्रीय आयोगाकडे ग्राहकाने अपील दाखल केल्यानंतर अपीलाची सुनावणी, अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत केली जाते.
  • अपिलकर्ता किंवा पक्षकाराचे विरुध्द राष्ट्रीय आयोगाने एकतर्फी निकाल दिल्यास बाधित पक्षकाराला आयोगाकडे आदेश रद्द ठरविण्यासाठी अर्ज करता येतो.
  • अपीलकर्त्यांच्या अर्जावरुन किंवा राष्ट्रीय आयोगाला स्वत:हून कोणत्याही वेळी, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास, राज्यातील कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरण दुसर्‍या जिल्हा मंचाकडे किंवा एका राज्य आयोगामधून दुसर्‍या राज्य आयोगाकडे वर्ग करण्याचा अधिकार आहे.

    सर्वोच्च न्यायालयाकडे अपील का? कसे करावे?
  • राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीला असा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते.
  • राष्ट्रीय आयोगाच्या आदेशान्वये रक्कम भरणे असेल तर, अपील करणार्‍या व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ५० हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती भरल्याशिवाय न्यायालयात अपील करता येणार नाही.
  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्या आदेशाविरुध्द संबंधिताने अपील न केल्यास आदेश अंतिम समजला जातो.

    आदेशाचे अनुपालन न केल्यास दंड व कारावास
  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्यासमोर दाखल करण्यात आलेली तक्रार निरर्थक असल्याचे आढळल्यास मंच किंवा आयोग लेखी कारणे नोंदवून अशी तक्रार फेटाळतात. तसेच पक्षकाराला १० हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल एवढ्या खर्चाची रक्कम देण्याबाबत आदेश देतात.
  • ज्यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली, असा कोणताही व्यापारी किंवा राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर करीत असेल तर किंवा अनुपालन करण्यास चुकत असेल अशा बाबतीत संबंधितास कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामध्ये एक महिन्यापेक्षा कमी नसलेल्या परंतु तीन वर्षापर्यंत वाढवता येण्याजोग्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या परंतु १० हजार रुपयापर्यंत वाढविता येण्याजोग्या दंडाची किंवा दोन्हींची शिक्षा दिल्या जाण्यास पात्र असेल. अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

    राज्य ग्राहक आयोगाचा पत्ता :
    अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग,
    प्रशासकीय महाविद्यालय, कक्ष क्र.१ व २, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई - ४०० ००१। !!आन्नासाहेब चौधरी !!
  • शनिवार, २३ मे, २००९

    जिवनात यशस्वी कसे व्हाल?


    एखादं क्षेत्र निवडताना ते मनापासून आवडतं आहे का, याबरोबर आपली त्या क्षेत्रात उत्तमोत्तम काम करण्याची किती तयारी आहे, हाही विचार करणं गरजेचं असतं. “उत्तमाच्या आराधने’ने आपण जग जिंकू शकतो.योगशास्त्राने अंतःकरणाची त्याच्या कार्यानुसार चार भागांत विभागणी केली आहे. एक आहे चित्त, जे पंचेद्रियांद्वारे जगाचा अनुभव घेते आणि स्मृतीमध्ये साठवून ठेवते. दुसरा भाग आहे, अहंकार, जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे आणि आपल्या आवडीनिवडीतून तो व्यक्त होत असतो. वस्तू आणि घटना यांचे सत्य स्वरूप जाणण्याची आणि ते ज्ञान साठवून ठेवण्याची कामगिरी बुद्धिमत्ता करते, तर चौथा भाग मन हे भविष्याचा वेध घेऊन पुढील घटना चांगल्या वा वाईट असतील याचा ठोकताळा बांधण्याचा प्रयत्न करते. रोजच्या व्यवहारात या चारही अंतःकरणांचा उल्लेख मन असाच केला जातो. याखेरीज आणखी एक विशेष देणगी मानवजातीला मिळाली आहे आणि ती म्हणजे वाणी किंवा बोलण्याची क्षमता. मन अंतःकरणाच्या इतर तीन भागांसह जगाचा अनुभव घेते आणि वाणी त्या अनुभवाला शब्दरूप देते. अशा तऱ्हेने आपण कोणतीही गोष्ट शिकतो; एक तर स्वानुभवातून किंवा इतरांनी घेतलेल्या अनुभवांचे वर्णन ऐकून.विवेकबुद्धी महत्त्वाचीमाणसाकडे आणखी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे त्याचे अंतर्मन किंवा विवेकबुद्धी. ही सर्वसाक्षी परमेश्‍वराच्या किंवा आत्म्याच्या फार निकट असते. अंतःकरणाच्या आणि वाणीच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम ही शक्ती करते. एकाग्रता साधण्याची शक्ती जशी मनात आहे तशीच कोठेही एकाग्र न होता प्रत्येक क्षणाला अनेक अवधाने सांभाळण्याची सुद्धा शक्ती मनात आहे. जेव्हा मन एखाद्या गोष्टीवर एकाग्र होते तेव्हा अंतःकरणाच्या सर्व शक्‍तीसुद्धा त्याच वस्तू अथवा घटनेवर लक्ष केंद्रित करतात आणि मनात शब्दरूपाने येणारे विचार वाणी व्यक्त करते. लक्ष केंद्रित करणे आणि न करणे या दोन्ही शक्ती रोजच्या व्यवहारात आवश्‍यकच आहेत. जेव्हा एकाग्रता असते तेव्हा अंतर्मन हे अंतःकरणाला नियंत्रित करीत असते पण अशा तऱ्हेने नियंत्रण ठेवलेले अंतःकरणाला आवडत नाही. त्यामुळे ते सवयी लावते. या सवयी आपले विचार, भावना आणि प्रतिसाद नियंत्रित करीत असतात. एकदा सवयी लागल्या की जे घडतंय त्याकडेअंतःकरणाला लक्ष द्यावे लागत नाही आणि ते मग मुक्तपणे इकडे तिकडे भटकू शकते.काही सवयी आपल्या उद्दिष्टाकडील वाटचालीत आपल्याला मदत करतात. अशा सवयी जास्त असतील तर तुम्हाला नशीबवानच म्हणावे लागेल पण अनेक वेळा, सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयमार्गावरून विचलित करणाऱ्या, दूर नेणाऱ्या असतात. अयोग्य सवयी शोधून त्या सोडण्यासाठी आणि योग्य मार्गावर ठेवणाऱ्या सवयी जोपासण्यासाठी योगामधील साधनांचा उपयोग होतो. अंतःकरणाच्या सर्व शक्तींना शिस्त लावून एकाग्रता न साधल्यास आयुष्य कोणत्याही नियंत्रणाशिवाय वाऱ्यावर भरकटणाऱ्या बोटीसारखे हेलकावे खाऊ लागते आणि पर्यायाने दुःख व अपयश हाती येते.
    अंतःकरणाच्या शक्तींना शिस्त लावण्याचा आणि आयुष्याची सूत्रं आपल्या ताब्यात घेण्याच्या पद्धती योगशास्त्रात आपल्याला शिकायला मिळतात. अन्यथा सरदारांनी आणि मंत्र्यांनी ज्याची सत्ता बळकावली आहे अशा दुबळ्या सम्राटासारखी आपली अवस्था होते. सम्राटाला न जुमानणारे हे मंत्री अखेर त्या सम्राटाला तुरुंगात टाकून सत्तेवर कब्जा मिळवतात खरा; पण राज्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसल्याने हाती दुःखच येते.
    तीव्र इच्छा हवी!पहिले काम म्हणजे तुम्ही जे काही करता ते करण्यामागचे खरे कारण शोधा. मी हे का करीत आहे, असा प्रश्‍न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि जे उत्तर मिळेल त्यातून त्याची निवड करण्याची कारणे तुम्हाला मिळतील. एखादे विशिष्ट क्षेत्र किंवा विशिष्ट खेळ निवडण्यामागे त्याची मनःपूर्वक आवड किंवा मनात खोलवर कुठेतरी तीव्र इच्छा असते. जर ही उत्कट इच्छा ओळखता आली, अधिक दृढ करता आली तर त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याची बांधिलकी निर्माण होऊ लागते. तुम्ही जे करता त्यावर तुमचे प्रेम असेल तर ते काम तुम्ही उत्तम तऱ्हेने करू लागता आणि मग यशाच्या शक्‍यता वाढतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही फक्त तुमच्या आवडीचे क्षेत्रच निवडू शकता, त्यातील आव्हाने नाही! आव्हाने तुमच्या अंगावर अचानक येऊन पडतात आणि ती जशी येतात, तशी तुम्हाला स्वीकारावी लागतात. काही वेळा तुम्हाला तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचीही संधी मिळत नाही. अशावेळी चिडचिड किंवा खंत करीत बसलात तर त्याचा परिणाम कामगिरीवर होऊन यश नक्की हुलकावणी देते.ज्याप्रमाणे स्वतः निवडलेली व तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट तुम्ही उत्तम करू शकता त्याचप्रमाणे आव्हान स्वीकारण्याची भावनाही तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत नेऊ शकते. प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ खेळायला आवडते पण त्यातील कौशल्ये मिळवण्यासाठी लागणारे कष्ट घ्यायला मात्र तो फारसा राजी नसतो.
    उत्तमावर लक्ष हवंअंतःप्रेरणा आणि आव्हाने शोधून त्यांच्याशी असलेली बांधिलकी दृढ करणे ही खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. याविषयी एकदा खात्री करून घेतली नाही तर कष्ट झेलण्याची इच्छाच नाहीशी होते. त्याग आणि मोहांपासून दूर राहणे जमेनासे होते. त्यामुळे स्टॅमिना, कौशल्य आणि सामर्थ्य कमावण्यासाठी लागणारी शिस्तही पाळणे जमत नाही आणि मग जिंकण्याच्या सर्व शक्‍यता मावळू लागतात.परस्परावलंबी अशा दोन सवयी कोणत्याही परिस्थितीत मोडल्या पाहिजेत. आपली स्मृती अशी युक्ती करीत असते, की त्यामुळे ज्याचा विसर पडायला हवा तेच सतत आठवत राहते. भूतकाळातील चुका आणि अपयश याचे स्मरण इतक्‍या वेळा केले जाते, की ते अक्षरशः स्मृतीत कोरले जाते. मग हळूहळू ते आपल्या व्यवस्थेत झिरपते आणि मग त्याच चुकांची पुनरावृत्ती सातत्याने होऊ लागते. यातून दुसरी सवय जडते अन्‌ ती म्हणजे भविष्यकाळाची भीती वाटू लागते.
    भूतकाळातील चुकांमुळे क्षुब्ध होणे आणि चुकांबद्दल धुसफुसत राहणे आणि भविष्याची काळजी करणे या दोन घातक सवयी अंतिमतः दुःखाकडे नेतात. या अयोग्य सवयींपासून सुटका करून घेण्यासाठी उत्तमावर लक्ष एकाग्र करायचे आणि ते जेव्हा व्यक्त होईल तेव्हा त्याचा सन्मान, सत्कार करायचा. ही सवय जडली की प्रतिस्पर्ध्याच्या नैपुण्याची भीती वाटेनाशी होते कारण प्रतिस्पर्ध्यातील उत्तमाचा सत्कार तुमच्यामधील सर्वोत्तम व्यक्त होण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा त्याचा सर्वोत्तम खेळ खेळत असतो तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक कौशल्य तुम्ही दाखवू शकला तरच तुम्ही विजयी होऊ शकता. तुम्ही जिंकावे म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडूने खराब खेळ करावा अशी आशा केल्यास, तुमचे जिंकण्याचे मनसुबे धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत!
    गुणवत्तेला बांधिलकीची जोड हवी!गुणवत्ता हेरून त्याला प्रोत्साहन देण्याबाबत खूप बोलले जाते. पण थोडे प्राथमिक यश वगळता केवळ गुणवत्ता उपयोगी ठरत नाही हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. एकदा खेळाडू वरच्या श्रेणीत जाऊ लागला, की त्याला अपयश येऊ लागते आणि ते स्वीकारणे पार जड जाते. गुणवत्तेला जोड हवी ती संपूर्ण बांधिलकीची आणि ध्येयाप्रती समर्पणाची; विजयासाठी आवश्‍यक अशी कौशल्ये यामुळे जोपासता येतात. या गुणांच्या अभावामुळे अनेक हुशार व्यक्तींच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे असे आढळून येते. याउलट, फार थोडी हुशारी असलेले, पण सर्वोत्तमाचा ध्यास घेतल्याने सर्वोच्चपदी पोचलेले व तेथे बराच काळ टिकलेले अनेक जण आढळतात. बुद्धिमत्ता ही दैवी देणगी आहे पण ती देणगी मिळाली नाही तर काळजी करण्याचे कारण नाही. बांधिलकी आणि समर्पण हे अधिक खात्रीपूर्वक तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेतील. दृढ संकल्प केल्यास कोणतेही कौशल्य अथवा ध्येयसिद्धी अशक्‍य नाही.
    भविष्याचा विचार करताना स्थैर्याची चिंता तुम्हाला सतावत असते. प्रत्येकाला लवकरात लवकर आश्‍वस्त करणारा आणि स्थैर्य देणाराभविष्यकाळ हवा असतो. यासाठी समर्पण आणि दृढ संकल्प या साधना उपयोगी पडतात. योगशास्त्र असे सांगते की जर तुम्ही सर्वोत्तमाची आराधना केलीत, त्यावर लक्ष एकाग्र केले तर ते तुमच्यात बिंबवले जाते आणि मग तुम्हाला रोजीरोटीची चिंता करावी लागत नाही. कारण समृद्धी ही उत्तमाच्या मागोमाग येतेच.बांधिलकी, समर्पण आणि कष्ट या साऱ्यांना पर्याय नाहीत, याची सवय जोपासल्यास तुम्ही केवळ अजिंक्‍यच नाही तर समृद्धही व्हाल। !! आन्नासहेब चौधरी !!

    महाराष्ट्र माझा


    लाल काळी माती इथलीअठरापगड जातीकणखर आहेत मनं अमुचीफडके झेंडा जगीशिवरायाचे वारस आम्हीकृष्णा कोयना माताविठुराया तर बाप अमुचासह्याद्री आहे सखा
    इथे जन्मला शेर शिवबाइथे जन्मली गानकोकिळाइथेच जन्मले लोकमान्य अनइथे जन्मले ग्यानबा तुका
    अभेद्य आहे अजोड आहेआहे महाराष्ट्र अमुचाइथे जन्मलो इथे वाढलोपावन झाला जन्म अमुचा
    अखंड वादळे झेलीत राहीलमहाराष्ट्र माझाशतकानुशतके असाच राहीलमहाराष्ट्र माझा

    !! आन्नासहेब चौधरी !!

    बुधवार, २० मे, २००९

    !! M.P.S.C. परीक्षेला जाता जाता !!

    !! M.P.S.C. परीक्षेला जाता जाता !!
    महाराष्ट्र लोकसेवा आयोग ३१ मे २००९ रोजी घेत असलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आता काही दिवसच उरले आहेत. आयोग घेत असलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, मंत्रालय कक्षाधिकारी, तहसीलदार व इतर पदांकरीता सरळ भरती असते. या दिवसात नियोजनपूर्वक केलेला अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचा आहे.
    राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ‘सामान्य क्षमता चाचणी’ हा एकच पेपर असतो. एकूण २०० बहुपर्यायी प्रश्न असलेला हा पेपर २ तासांत सोडवायचा असतो. या पेपरमध्ये कला शाखा घटक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व अर्थव्यवस्था, कृषीशास्त्र, प्रचलित घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी असे सहा उपघटक असतात.
    कला शाखा घटक :
    कला शाखा घटकासंबंधी ३० ते ४० गुणांचे प्रश्न विचारले जातात. कलाशाखा घटक ५ भागांत विभागलेले असून प्रत्येक
    विभागाला साधारणत: ६ ते ७ गुणांचे प्रश्न विचारले जातात. कला शाखा घटकातील विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
    इतिहास, समाजसुधारक, भारतीय राज्यपद्धती, पंचायतराज, भूगोल.
    आता आपण विभागावर माहिती घेऊ.
    इतिहास : इतिहासावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. इतिहासात सनावळी लक्षात ठेवणे जरी थोडेसे कठीण असले तरी अशक्य नसते. इतिहास हा विषय अभ्यासताना ब्रिटिश सत्तेची पायाभरणी व विस्तार, ब्रिटिश सत्तेचे दृढीकरण, १८५७ चा उठाव, काँग्रेसची स्थापना, जहालांचा कालखंड, गांधीजींचा कालखंड, स्वातंत्र्यप्राप्तीकडे वाटचाल, क्रांतिकारी चळवळ, भारतीय प्रबोधनाचा कालखंड इत्यादी घटक येतात. या घटकांचा सुनियोजित अभ्यास करणे आवश्यक असते.
    इतिहासासाठी खालील पुस्तके अभ्यासावीत.
    (१) आधुनिक भारताचा इतिहास: भाग २ व ३ - सुमन वैद्य
    (२) आधुनिक भारताचा इतिहास: जयसिंगराव पवार
    समाजसुधारक : या घटकावर साधारणत: ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. महाराष्ट्रात ब्रिटिशांचे राज्य आले. त्यांची विचारसरणी- साहित्य- प्रशासन-कायदे इत्यादीमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनात प्रचंड उलथापालथ झाली. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या एका नव्या पिढीने प्रबोधनाच्या चळवळीला प्रारंभ केला. पाश्चात्त्य शिक्षण घेतल्यामुळे एतद्देशीयांमधील दोष या पिढीच्या लक्षात येऊ लागले. भारतीय वर्गव्यवस्था, जातीयता, स्त्रियांच्या समस्यांकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. समाजसुधारकांनी नियतकालिकांमधून आपले विचार मांडले. त्यांच्या समाजकार्याला कालसापेक्ष मर्यादा होत्या, परंतु पुढच्या चळवळीचा पाया त्यांनीच भक्कम केला. वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांच्या माध्यमातून समाजसुधारकांनी समाजजागृतीचे कार्य केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास या घटकांर्गत प्रश्न पुढील विषयांवर आधारित असतात.
    सामाजिक संस्था, समाजसुधारक, समाजसुधारकांची ग्रंथसंपदा, वृत्तपत्रे, काही ठळक/ उल्लेखनीय घटना व वर्षे.
    अभ्यासाकरिता पुस्तके
    (१) भारतीय समाजसुधारक: फडके प्रकाशन
    (२) महाराष्ट्रातील समाजसुधारक- चाणक्य मंडल प्रकाशन
    * भूगोल : भूगोलावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भूगोल या घटकात भारताच्या भूगोलासहित महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास करणे आवश्यक असते. या भागाचा व्यवस्थित नियोजनाने अभ्यास केल्यास सर्वच्या सर्व गुण मिळू शकतात.
    भारताचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक रचना, मृदा, नदी प्रणाली, वने, प्रकल्प, यावर भर असावा तर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, मृदा, वने, जलसिंचन, कृषी, ऊर्जा साधने, खनिजसंपत्ती उद्योगधंदे, लोकसंख्या, वाहतूक, पर्यटन या घटकांवर भर द्यावा.
    अभ्यासासाठी पुस्तके
    (१) इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके
    (२) महाराष्ट्र- डॉ. संतोष दास्ताने
    राज्यपद्धती : या घटकावर साधारणत: ६ ते ७ प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यपद्धती या घटकात भारतीय राज्यघटनेचा इतिहास, राज्यघटनेची वैशिष्टय़े, राज्यघटनेत समाविष्ट बाबी, केंद्रीय कार्यकारी व कायदेमंडळ, घटक राज्याचे कार्यकारी व कायदेमंडळ, सर्वोच्च व उच्च न्यायालय, केंद्र- राज्य संबंध, घटना दुरुस्त्या व कलमे यांचा समावेश आहे. तसेच काही महत्त्वाची पदे, त्यांची वेतने, त्यांची आवश्यकता, अधिकार व कार्य इत्यादी गोष्टींचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केल्यास राज्यपद्धतीचे सर्वच्या सर्व गुण मिळविणे अजिबात कठीण नाही.
    अभ्यासासाठी पुस्तके
    (१) भारतीय राज्यपद्धती- प्रा. बी. बी. पाटील.
    (२) भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार- डॉ. बाचल.
    ग्रामप्रशासन : या घटकावर साधारणपणे ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. यामध्ये ग्रामप्रशासनातील तीन स्तर म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकशाही विक्रेंद्रीकरणाचा इतिहास, लोकशाही विकेद्रीकरणासाठीच्या विविध समित्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. ग्रामप्रशासनातील तीन स्तर, त्या प्रत्येक स्तरावर कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे. या सोबतच महसूल व पोलीस प्रशासन, नेमणूक, निवड इत्यादी विषयांवरही प्रश्न विचारले जातात.
    अभ्यासासाठी पुस्तके
    (१) नागरिकशास्त्र : इयत्ता आठवी ते दहावीची पुस्तके.
    कला शाखेतील विभागानंतर आता इतर घटकांची माहिती घेऊ.
    विज्ञान-तंत्रज्ञान :
    राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर साधारणत: २५ ते ३० प्रश्न विचारले जातात. या विषयाचे योग्य मार्गदर्शन आणि योग्य संदर्भ पुस्तकांचा आधार घेतल्यास किंवा वाचन केल्यास हा विषय विद्यार्थ्यांस पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे.
    विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारले जाणारे प्रश्न खालील घटकांवर आधारित असतात. विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानातील गृहीते, वैज्ञानिक पद्धती, केवलगणन पद्धती, साम्यानुमान आणि प्रतिकृती, सिद्धांत कल्पना (अभ्युपगम), शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान, मूलभूत शास्त्रीय संकल्पना, आरोग्य, उत्पादकता, वाहतूक आणि विनिमय, परंपरा, संस्कृती, धर्म आणि मानवी मूल्ये, आधुनिकीकरण व भारतीय समाज, परिसर आणि प्रदूषण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उत्तुंग झेप, तंत्रज्ञानाधिष्ठित समाज. दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर २५ ते ३० प्रश्न विचारले जात असले तरी कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारतील हे निश्चित सांगता येत नाही आणि या विषयाच्या एखाद्या घटकाबद्दलही हेच तत्त्व लागू पडते म्हणून विद्यार्थ्यांचा या विषयासंबंधी अभ्यास सखोल असणे आवश्यक आहे.
    अभ्यासाकरिता पुस्तके
    (१) विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन- सेठ प्रकाशन.
    (२) इयत्ता आठवी ते दहावीची सामान्य विज्ञानाची पुस्तके.
    कृषीशास्त्र :
    या विषयावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. कृषी हा विषय समजण्यास सोपा व काळजीपूर्वक अभ्यास केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. कृषीविषयक घटकांत शेती व शेतीशी संलग्न विषय मोडतात. हे खालीलप्रमाणे-
    जमिनीचा वापर व प्रमुख पिके. यात कृषी-हवामान, खरीप-रब्बी पिके, प्रमुख पिके, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिकांची लागवड या विषयी प्रश्न असतात.
    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, वनविकास व वन उत्पादने, मत्स्यव्यवसाय यावर प्रश्न असतात.
    कृषी अर्थशास्त्रामध्ये शेती व्यवस्थापनशास्त्र, शेती नियोजन व अर्थसंकल्प, कृषी वित्तपुरवठा प्रकार, भू-अधिकारविषयक सुधारणा, शेतमाल विक्री व्यवस्था, भारतातील पंचवार्षिक योजना व शेती व्यवसाय या विषयावर प्रश्न असतात.
    अभ्यासासाठी पुस्तके
    (१) कृषीशास्त्र- पंचम प्रकाशन.
    (२) कृषी अर्थव्यवस्था- डॉ. विजय कविमंडन.
    वाणिज्य व अर्थव्यवस्था :
    या घटकावर साधारणत: ३० ते ३५ प्रश्न विचारले जातात. ज्या आर्थिक घटकांशी प्रशासनाचा संबंध येतो अशा घटकांवर आधारित हे प्रश्न असतात. साधारणपणे शासकीय अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना, भारतीय बँकिंग यावर जास्त भर देण्यात आलेला आहे.
    भारतीय अर्थव्यवस्था यात भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, लोकसंख्या, भारताचा आयात-निर्यात व्यापार, परकीय कर्जे, भारताचे नियोजन तर शासकीय अर्थव्यवस्था यात शासनाची आर्थिक धोरणे, भारतातील करप्रणाली याचा अभ्यास करावा. भारतीय बँकिंग यात राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिका, बँकांचे राष्ट्रीयीकरण, कृषी पतपुरवठा, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास करावा.
    अभ्यासाकरिता पुस्तके
    (१) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) देसाई व भालेराव.
    (२) भारतीय अर्थव्यवस्था (भाग १ व २) भोसले व काटे.
    प्रचलित घडामोडी :
    या विषयावर जवळपास २० ते २५ प्रश्न विचारले जातात. मागील दहा वषार्ंतील राज्यसेवा पूर्वपरीक्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या पटकन लक्षात येणारी बाब म्हणजे चालू घडामोडीवर पूर्वपरीक्षेच्या आधी एक ते दीड वर्षांपासून ते परीक्षेच्या अगोदर एक महिन्यापर्यंत घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. यामध्ये आपल्याला साधारणपणे दहा विभाग पाडता येतात. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी, प्रसिद्ध व्यक्ती परिषदा- स्थळे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडाविषयक घडामोडी, दिनविशेष विविध समित्या, अन्य प्रचलित घडामोडी. या घटकाचा अभ्यास करताना नियमित वृत्तपत्र वाचन असावे तसेच स्पर्धा परीक्षांकरिता वाहिलेली मासिके तसेच योजना, लोकराज्य वाचावे.
    बुद्धिमापन चाचणी :
    या घटकावर २०० पैकी ५० प्रश्न असतात. या विषयाच्या प्रश्नांची संख्या बघता परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या प्रश्नांवर जास्त तयारी करणे आवश्यक आहे आणि हा एकमेव विषय असा आहे की, ज्यात ठरवून पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात.
    बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सोडविण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक ठरतात. (१) तर्कशुद्ध विचार (Logical Thinking) (२) सराव (Practice)
    या दोन्हींसाठी वेगवेगळ्या पुस्तकातील विविध प्रकारचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आधीच्या प्रश्नपत्रिकांवरून बघता येईल.
    या घटकात संख्या श्रेणी, संख्यारचना, संख्या संबंध, अक्षर-अक्षर संबंध, अक्षर-अंक संबंध, विसंगत पर्याय, शब्द-शब्द संबंध यावर प्रश्न असतात.
    अभ्यासाकरिता पुस्तके
    (१) मानसिक क्षमता कसोटी- वा. ना. दांडेकर.
    (२) स्पर्धा परीक्षा- बुद्धिमापन चाचणी- वा. ना. दांडेकर.
    वरील सर्व घटकांचा समावेश असणारे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयार केलेली गाईडस् व प्रश्नसंच बाजारात उपलब्ध आहेत. यांचाही अभ्यासाकरिता चांगला उपयोग होतो.
    पेपर लिहिण्याचे तंत्र :
    आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर लिहिण्याच्या तंत्राविषयी माहिती घेऊया.
    बहुपर्यायी प्रश्नांमध्ये एक प्रश्न देऊन त्याच्या खाली अ, ब, क, ड या प्रकारे चार पर्याय दिलेले असतात व त्यातून एका योग्य पर्यायाची निवड करून त्या पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल करावयाचा असतो. त्यावरून विद्यार्थ्यांच्या त्या घटनेची किती अचूक माहिती आहे हे बघितले जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चाळणी परीेक्षा असते. यात पास झालात तरच मुख्य परीक्षेला प्रवेश दिला जातो. म्हणूनच या परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य, वेळेचे सुयोग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा ठरतो.
    सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे पेपरसाठी परीक्षा केंद्रावर पुरेसे आधी पोहोचणे. धांदल नको तसेच मन शांत, एकाग्र ठेवणे महत्त्वाचे असते. उत्तरपत्रिकेत एकाच प्रश्नात एकापेक्षा जास्त गोल आढळले तर त्यातील एक उत्तर बरोबर असून देखील एकूण उत्तर चुकीचे धरले जाते. त्यामुळे उत्तरांचा गोल हा विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना सलगच प्रश्न सोडवावेत, असे कुठलेही बंधन नसते, तर जसे प्रश्न येतील तसे सोडवावेत. मात्र उत्तरपत्रिकेत काळजीपूर्वक त्याच नंबरच्या प्रश्नांच्या पुढे उत्तर लिहावे, नाही तर गोंधळ निर्माण होतो. यानंतर वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे असते. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर ५ मिनिटे ती वाचण्यासाठी द्यावीत. मात्र त्या वेळी पेपर कितीही अवघड असला तरी निराश होऊ नये, अगर कितीही सोपा असला तरी हरखून जाऊ नये. कारण वरील दोन्ही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हातून जास्त चुका होण्याची शक्यता असते.
    परीक्षेच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे सगळ्यांनी सारखाच अभ्यास केलेला असतो. त्यामुळे पेपर हा सर्वानाच अवघड किंवा सोपा वाटू लागतो. अशा वेळी स्थितप्रज्ञ असणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका चांगली पंधरा-सोळा पानी असते. प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या जागीच कच्चे काम करावे लागते. इतर कागदांवर कच्चे काम केल्यास ते अयोग्य मानले जाते. पेपर चाळून झाल्यावर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची. पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवताना खाली दिल्याप्रमाणे अ, ब, क हे प्रकार फार महत्त्वाचे आहेत. या तीन पद्धतीनुसार पेपर सोडवला असता नियोजित वेळेत तो पूर्ण होण्यास मदत होते.
    ‘अ’ प्रकार : या प्रकारात ज्या प्रश्नांची आपल्याला पूर्णपणे अचूक उत्तराची खात्री आहे तेच प्रश्न फक्त सोडवायचे असतात. एकूण २०० प्रश्नांपैकी जेवढे जास्तीत जास्त प्रश्न ‘अ’ प्रकारात सोडवता येतील तेवढे. तुमचे खात्रीचे गुण आहेत. तसेच ‘अ’ प्रकाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रश्न हे कमीत कमी वेळात सोडवू शकतो. त्यामुळे इतर अवघड प्रश्नांचा विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. म्हणून ‘अ’ प्रकार काळजीपूर्वक वापरावा. ‘अ’ प्रकारात न सोडवलेल्या प्रश्नांचे नंबर कच्च्या कागदावर टाका. त्यामुळे तेवढय़ाच प्रश्नांवर पुढील ‘ब’ व ‘क’ पद्धतीत भर देता येईल.
    ‘ब’ प्रकार : या प्रकारात केवळ प्रश्न पाहिल्यावर उत्तर सुचत नाही तर चारही पर्याय पाहावे लागतात. स्मरणशक्तीला थोडा ताण दिला की, उत्तर आठवते. अनेक वेळा पेपरमधील परस्पर प्रश्नांत देखील एकमेकांची उत्तरे सापडू शकतात. तसेच जोडय़ा जुळवा प्रकारात देखील नीट विचार केला तर योग्य उत्तर सापडू शकते. बुद्धिमापन चाचणीतील आकडेमोड, वेगवेगळी लॉजिक यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. या प्रकारात जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क पद्धतीत जास्तीत जास्त प्रश्नांचा विचार करून योग्य ते उत्तर लिहावे. अ व ब प्रकारातून जेवढे प्रश्न उरतात ते सर्व प्रश्न क प्रकारात येतात.
    ‘क’ प्रकार : सर्वसाधारणपणे ‘क’ प्रकार म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर अजिबात आठवत नाही, असे प्रश्न होय. सामान्यत: ‘क’ प्रकारात जेवढे कमी किंवा जास्त प्रश्न राहिले असतील त्यावरून पेपर सोपा किंवा अवघड हे समजते. पूर्वी ‘क’ प्रकारातील प्रश्नांच्या उत्तरांसाठी चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचे अक्षर निवडून सर्व क प्रकारातील प्रश्नांना त्या अक्षराचे उत्तर लिहिले जायचे. ०.२५ टक्के निगेटिव्ह मार्क पद्धती या परीक्षेला पहिल्यांदा लागू झाली आहे. त्यामुळे क प्रकारातील प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवेत. या पद्धतीला method of elimination असे म्हणतात. या पद्धतीत ४ पर्यायांपैकी एकच बरोबर असेल तर पूर्ण मटका मारण्यापेक्षा (म्हणजे चारही पर्यायांबद्दल काहीच खात्री नसणे) असे प्रश्न वेगळे लिहून ठेवावेत की ज्यात किमान १ किंवा निदान २ तरी पर्याय तुम्ही नक्की चूक ठरवू शकलेले आहात. जरी ठाम उत्तर माहिती नसेल तरीही फक्त दोनच पर्यायांतील एक पर्याय सहज निवडला, मटका मारला तरी दर ४ प्रश्नांमध्ये निदान एक तरी उत्तर बरोबर येण्याची शक्यता खूपच चांगली आहे आणि आपण हे लक्षात घेऊ की MPSC मध्ये चार प्रश्नांपैकी एक जरी बरोबर आला आणि उरलेले तीनच्या तीन चुकले तर तुमचे एकूण गुण हे बरोबरचा १ गुण व चुकलेल्या तीन प्रश्नांचे ०.७५ गुण म्हणजेच ०.२५ गुणांचा फायदा आहे. या ०.२५ गुणाधिक्यामुळे तुम्ही तुमच्या बऱ्याच प्रतिस्पध्र्याना मागे टाकलेले असते.
    अ, ब, क प्रकारानुसार पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवला गेल्यास वेळेचा पूर्णपणे वापर होऊन जास्तीत जास्त गुण मिळवून यश नक्कीच खेचून आणता येईल.
    सर्वाना परीक्षेसाठी BEST OF LUCK.

    मंगळवार, २७ जानेवारी, २००९

    माझा मराठा

    मराठा
    मी मराठा आहे! सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात अशी आमची मर्द मराठा जात पहा चाळुन पाने आमुच्या इतिहासाची. महाराष्ट्राच्या मातीला , मराठ्याच्या छातीला, अवघ्या प्रुथ्वीतलावर कधीहि तोड नव्हती, नाहिये आणि यापुढेहि नसनारच. कारण आम्हीच राजे होतो, आम्हीच राजे आहोत अन भविष्यातही आम्हीच राजे राहनार. आम्ही राजे होतो ते समशेरीच्या जोरवर अन मनगटातल्या बळावर. होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून महाराष्ट्र उभा केला राजांनी! ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही सहिष्णुतेला. दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची संवेदनाही भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला शॄंगार कधीचं गमावला नाहिये. प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक उज्ज्वल भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा. आणि हे बदलण्याची ताकत आहे मराठयांच्या मनगटात... सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे ।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे या सत्येला पंख विजयाचे ।।ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती